श्रीमंत केसरी प्रतिष्ठान आयोजित
छ. संभाजीनगर विभागीय  शंखवादन स्पर्धा यशस्वीपणे संपन्न!

२ फेब्रुवारी २०२६ (रविवार): श्रीमंत केसरी प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने छ. संभाजीनगर विभागीय पहिली शंख वादन स्पर्धाचे  भव्य आयोजन छ. संभाजीनगर  येथील श्री समर्थ राम मंदिर समर्थ नगर,श्री वरद गणेश मंदिर जवळ, छत्रपती संभाजी नगर ,येथे पार पडली.ही स्पर्धा छ. संभाजीनगर विभागासाठी घेण्यात आली होती. यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमधून विविध वयोगटांतील शंखवादक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी ५ वयोगट बनविण्यात आले होते. प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच ५ उत्तेजनार्थ पारितोषिके व सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

शंखवादन स्पर्धेचे उद्दिष्ट:

या ऐतिहासिक स्पर्धेचा मुख्य उद्देश म्हणजे शंखवादन या पौराणिक परंपरेचा प्रचार व प्रसार करणे, नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे, शंखवादना सारख्या प्राचीन विद्येला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, आणि या परंपरेला आधुनिकतेशी जोडून नव्या जोमाने पुढे नेणे हा उद्देश होता.

!! ही केवळ एक स्पर्धा नव्हे, तर संस्कृती, परंपरा आणि आत्मशक्तीचा एक नवा जागर !!

छ. संभाजीनगर विभागीय  शंखवादन स्पर्धा २०२६ — यशस्वी आयोजन

या भव्य स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्रीमंत केसरी प्रतिष्ठानचे शिक्षक

श्री. सोमनाथ शशिकांत वाले ,  श्री. संजीव चंद्रशेखर पडवळकर , श्री. प्रसाद विनायक बापट, शील्पा जगताप यांची नेमणूक करण्यात आली होती.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख अतिथी विश्व हिंदू परिषद मंदिर अर्चक पुरोहित संपर्क आयाम देवगिरी प्रांत प्रमुख श्री.राजीव जाहागिरदार , समर्थ रामदास स्वामी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री.माणिकराव रत्नपारखी  तसेच श्रीमंत केसरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. उमेश घन:शाम गडे व संस्थेचे कोषाध्यक्ष श्री.सुमेध वैद्य. मान्यवर उपस्थित होते.

या मान्यवरांनी आपल्या मनोगतातून श्रीमंत केसरी प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत संस्थेच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचे विशेष अभिनंदन केले. तसेच प्रतिष्ठानच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन आयोजक मंडळाला प्रोत्साहन दिले.

कार्यक्रमात श्रीमंत केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. उमेश घन:शाम गडे यांनी प्रतिष्ठानच्या उद्दिष्टांची व उपक्रमांची माहिती दीली व शंखा बद्द्ल उपयुक्त माहीती देत शंख वादन कसे करावे व विवीध प्रकारच्या शंखध्वीनी व शंख शंखध्वीनी तुन मंत्र उच्चारण व एका वेळेस दोन शंख वाजवत दोन शंख कसे वाजवावे या बद्द्ल मार्ग दर्शन केले व सर्व सहभागी शंखवादकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

स्पर्धा सकाळी 9:०० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाली आणि दुपारी १२:०० वाजेपर्यंत यशस्वीपणे पार पडली. त्यानंतर दुपारी १:०० वाजता मान्यवरांच्या हस्ते  बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करण्यात आली.विजेत्यांचे मान्यवरांनी कौतुक करत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव केले तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. 

या भव्य समारंभाचा समारोप दुपारी १ :०० वाजता झाला. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, उत्साही आणि भावनाप्रधान वातावरणात पार पडला.

!! श्रीमंत केसरी प्रतिष्ठान – परंपरा, संस्कृती, सेवा आणि ऐक्याचे  प्रेरणास्थान !!

छ. संभाजीनगर विभागीय शंख वादन स्पर्धा - २०२६ विजेते

गट क्रमांक – १ वय वर्ष  ८ ते १५ 

प्रथम क्रमांक – चि. मिहीर सचिन चिंचोलीकर  –  शंख विशारद गौरवपत्र

द्वितीय क्रमांक – चि.सुयश गुरुप्रसाद मराठे  – उत्कृष्ट शंखवादक सन्मानपत्र

तृतीय क्रमांक – चि.चैतन्य अमोल बिरारे – श्रेष्ठ शंखवादक प्रमाणपत्र

उत्तेजनार्थ –  चि.देवेश राहूल जोशी

 

गट क्रमांक – २ वय वर्ष  १५ ते ३०

प्रथम क्रमांक – चि. स्वरीत संदीप सिकची  –  शंख विशारद गौरवपत्र

द्वितीय क्रमांक – चि.आशुतोष गिरीशराव वरखडे  – उत्कृष्ट शंखवादक सन्मानपत्र

तृतीय क्रमांक – चि. आनंद भारती  – श्रेष्ठ शंखवादक प्रमाणपत्र

 

गट क्रमांक – ३ वय वर्ष ३० ते ४५

प्रथम क्रमांक – श्री. रुपेश भास्कर बंगाळे – शंख विशारद गौरवपत्र

द्वितीय क्रमांक – श्री.विश्र्वनाथ वीरभद्र स्वामी – उत्कृष्ट शंखवादक सन्मानपत्र

तृतीय क्रमांक – श्री. वरद पांडुरंग मारकड –श्रेष्ठ शंखवादक प्रमाणपत्र

 

 

गट क्रमांक – ४ वय वर्ष ४५ ते ६०

प्रथम क्रमांक – श्री. विलास गुलाबराव मांडे – शंख विशारद गौरवपत्र

द्वितीय क्रमांक – श्री. एकनाथ दत्तत्रय भारती – उत्कृष्ट शंखवादक सन्मानपत्र

तृतीय क्रमांक – श्री. सुभाष चिमाजी पाठक – श्रेष्ठ शंखवादक प्रमाणपत्र

उत्तेजनार्थ – श्री. दिनेश दिगंबर जोशी 

 

गट क्रमांक – ५ वय वर्ष ६० व  त्याहून पुढे

प्रथम क्रमांक – श्री. सुनील प्रितमदास उदासी –शंख विशारद गौरवपत्र

 

!! या स्पर्धेतील विजेते पुढील वर्षी आयोजित राज्यस्तरीय शंखवादन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्र ठरतील. !!

!! सन्मानचिन्ह व गौरवपत्र !!

!! प्रमाणपत्र !!

!! वृत्तपत्र !!

!! छायाचित्र !!