श्रीमंत केसरी प्रतिष्ठान आयोजित
नागपुर विभागीय  शंखवादन स्पर्धा यशस्वीपणे संपन्न!

 

दिनांक 05 एप्रिल 2026 रोजी (रविवार): श्रीमंत केसरी प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने

नागपूर विभागीय पहिली शंख वादन स्पर्धाचे  भव्य आयोजन नागपूर येथील पंडित बच्छराज व्यास हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ,येथे पार पडली.ही स्पर्धा नागपूर विभागासाठी घेण्यात आली होती. यात नागपूर,वर्धा,भंडार,गोंदीया,चंद्र्पुर,गडचीरोली. जिल्ह्यांमधून विविध वयोगटांतील शंखवादक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी ५ वयोगट बनविण्यात आले होते. प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच ५ उत्तेजनार्थ पारितोषिके व सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

शंखवादन स्पर्धेचे उद्दिष्ट:

या ऐतिहासिक स्पर्धेचा मुख्य उद्देश म्हणजे शंखवादन या पौराणिक परंपरेचा प्रचार व प्रसार करणे, नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे, शंखवादना सारख्या प्राचीन विद्येला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, आणि या परंपरेला आधुनिकतेशी जोडून नव्या जोमाने पुढे नेणे हा उद्देश होता.

!! ही केवळ एक स्पर्धा नव्हे, तर संस्कृती, परंपरा आणि आत्मशक्तीचा एक नवा जागर !!

नागपुर विभागीय  शंखवादन स्पर्धा २०२६ यशस्वी आयोजन

या भव्य स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्रीमंत केसरी प्रतिष्ठानचे शिक्षक

श्री. सोमनाथ शशिकांत वाले ,  श्री. संजीव चंद्रशेखर पडवळकर , यांची नेमणूक करण्यात आली होती.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख अतिथी श्री प्रशांत तितरे विश्व हिंदु परिषद विगर्भ प्रांत मंत्री. श्रीवासुदेव गोविंदराव नागपुरे विश्व हिंदु परिषद मंदिर अर्चक,पुरोहीत संपर्क आयाम प्रमुख. श्री विजय चौबे विश्व हिंदु परिषद मंदिर अर्चक,पुरोहीत संपर्क आयाम महानगर नागपुर प्रमुख.

सौ राधा चौबे भारतीय विचार मंचच्या शोध आयाम विदर्भ प्रांत सहप्रमुख.

अ‍ॅड.श्री रमण सेनाड विश्व हिंदु परिषद मंदिर अर्चक,पुरोहीत संपर्क आयाम विदर्भप्रांत सहसंयोजक तसेच श्रीमंत केसरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. उमेश घन:शाम गडे,उपाध्य्क्ष सौ.अश्र्वीनी उमेश गडे  व संस्थेचे कोषाध्यक्ष श्री.सुमेध वैद्य. हे मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी आपल्या मनोगतातून श्रीमंत केसरी प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत संस्थेच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचे विशेष अभिनंदन केले. तसेच प्रतिष्ठानच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन आयोजक मंडळाला प्रोत्साहन दिले.

कार्यक्रमात उपाध्य्क्ष सौ. अश्वीनी गडे यानी सुत्रसंचलन केले व प्रतीष्ठानच्या कार्याची माहीती दीली कु, आराध्या गडे ,श्रीसुमेध वैद्य , सोमनाथ वाले, श्री संजिव पडवळकर हे प्रतीष्ठानचे पदाधीकारी उपस्थीत होते व त्यानी ग्रुप शंखवादनाचे प्रात्यक्षीक सादर केले,  श्रीमंत केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. उमेश घन:शाम गडे यांनी प्रतिष्ठानच्या उद्दिष्टांची व उपक्रमांची माहिती दीली व शंखा बद्द्ल उपयुक्त माहीती देत शंख वादन कसे करावे व विवीध प्रकारच्या शंखध्वीनी व शंख शंखध्वीनी तुन मंत्र उच्चारण व एका वेळेस दोन शंख वाजवत दोन शंख कसे वाजवावे या बद्द्ल मार्ग दर्शन केले व सर्व सहभागी शंखवादकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

स्पर्धा सकाळी 10:०० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाली आणि दुपारी 1२:०० वाजेपर्यंत यशस्वीपणे पार पडली. त्यानंतर दुपारी १:०० वाजता मान्यवरांच्या हस्ते  बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करण्यात आली.विजेत्यांचे मान्यवरांनी कौतुक करत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव केले तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या भव्य समारंभाचा समारोप दुपारी 2 :०० वाजता झाला. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, उत्साही आणि भावनाप्रधान वातावरणात पार पडला.

!! श्रीमंत केसरी प्रतिष्ठान परंपरा, संस्कृती, सेवा आणि ऐक्याचे  प्रेरणास्थान !!

नागपुर विभागीय शंख वादन स्पर्धा - २०२६ विजेते

गट क्रमांक – १ वय वर्ष  ८ ते १५ 

प्रथम क्रमांक – चि. वेद अविनाश सेटिये  –  शंख विशारद गौरवपत्र

द्वितीय क्रमांक – चि.अद्विक टिकेश्वर भिवगडे  – उत्कृष्ट शंखवादक सन्मानपत्र

तृतीय क्रमांक – चि.विर रमण शर्मा – श्रेष्ठ शंखवादक प्रमाणपत्र

उत्तेजनार्थ –  चि.सुप्रण प्रसाद कुलकर्णी 

उत्तेजनार्थ – सौम्या वासुले

उत्तेजनार्थ – श्राग पंकज कोल्हे

उत्तेजनार्थ – पार्थ विवेकांत राघोने

उत्तेजनार्थ – कु.अनवी श्रीकांत बरडे

 

गट क्रमांक – २ वय वर्ष  १५ ते ३०

प्रथम क्रमांक – चि. हर्ष निलेश मुसळे  –  शंख विशारद गौरवपत्र

 

 

गट क्रमांक – ३ वय वर्ष ३० ते ४५

प्रथम क्रमांक – श्री. राहुल मारोती पूरी – शंख विशारद गौरवपत्र

द्वितीय क्रमांक – श्री.गौरांग जोशी – उत्कृष्ट शंखवादक सन्मानपत्र

 

 

 

गट क्रमांक – ४ वय वर्ष ४५ ते ६०

प्रथम क्रमांक – श्री. शिरीष रमेश मढीकर – शंख विशारद गौरवपत्र

द्वितीय क्रमांक – श्री. नरेंद्र देविदास मुटकुरे – उत्कृष्ट शंखवादक सन्मानपत्र

तृतीय क्रमांक – सौ. कांचन कमलेश पैठणकर – श्रेष्ठ शंखवादक प्रमाणपत्र

उत्तेजनार्थ –  वैषाली चीडे

 

गट क्रमांक – ५ वय वर्ष ६० व  त्याहून पुढे

प्रथम क्रमांक – श्री. नरेंद्र कृष्णराव नेमाड –शंख विशारद गौरवपत्र

द्वितीय क्रमांक – श्री. विजय वसंत वखरे- उत्कृष्ट शंखवादक सन्मानपत्र

तृतीय क्रमांक – श्री. कृष्णा पंढरी डोमके – श्रेष्ठ शंखवादक प्रमाणपत्र

!! या स्पर्धेतील विजेते पुढील वर्षी आयोजित राज्यस्तरीय शंखवादन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्र ठरतील. !!

!! सन्मानचिन्ह व गौरवपत्र !!

!! प्रमाणपत्र !!