श्रीमंत केसरी प्रतिष्ठान अयोजीत पहीली राज्यस्तरीय शंखवादन स्पर्धा व प्रदर्शन 

भारतीय संस्कृती, परंपरा आणि आरोग्याचा संदेश देणाऱ्या शंखाचा जागर करण्यासाठी ‘श्रीमंत केसरी प्रतिष्ठान’ आयोजित ‘राज्यस्तरीय शंखवादन स्पर्धा २०२६’ आणि ‘भव्य शंख प्रदर्शन’ रविवारी (दि. १६ ऑगस्ट) रोजी एम. ई. एस. भावे प्राथमिक शाळा, पुणे येथे अत्यंत उत्साहात पार पडले. सकाळी मान्यवरांच्या हस्ते दिपपूजन आणि वाद्य पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री योगेश श्री. निवास सोमण (अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे) आणि शुभांगी भालेराव (श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती सामुहिक महिला अथर्वशीर्ष पठण आयोजक) उपस्थित होते. भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशप्रेमाची भावना आणि शंखध्वनीचे मांगल्य यांचा सुंदर मिलाफ या प्रसंगी पाहायला मिळाला. या राज्यस्तरीय शंखवादन स्पर्धेत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधून निवडलेले ६ विभागांतील व ५ वयोगटांतील अव्वल शंखवादक सहभागी झाले होते.

१०० हून अधिक दुर्मिळ शंखांचे प्रदर्शन

या प्रसंगी आयोजित प्रदर्शनात विष्णु शंख, मणिपुष्प, पांचजन्य, मोती, गणेश, दक्षिणावर्ती आणि असे १०० हून अधिक दुर्मिळ व आकर्षक शंख नागरिकांच्या दृष्टीक्षेपासाठी मांडण्यात आले होते. तसेच शंखांचे शास्त्रीय व वैज्ञानिक महत्त्व, फोटोसहित माहिती दर्शवणारे फलक आणि शंखांवर आधारित प्रश्नोत्तरे मुख्य आकर्षण ठरले. शालेय विद्यार्थी व पुणेकरांनी या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद दिला.

वैविध्यपूर्ण सादरीकरण व पारितोषिक वितरण

संध्याकाळी मान्यवरांच्या हस्ते दिपपूजन आणि वाद्य पूजनाने बक्षिस वितरण सोहळ्यास प्रारंभ झाला. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी श्री. विजय अरुण भालेराव (संस्थाचालक सदस्य-MES व अध्यक्ष – ICT व क्रीडा-EBSM शाळा), सौ.अर्चना विजय भालेराव (श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती सामुहिक महिला अथर्वशीर्ष पठण आयोजक), श्री. धीरज गोपाळ पाटील (चितोडेवाणी समाज प्रगती प्रतिष्ठान, पुणे अध्यक्ष), व सौ शुभांगी धीरज पाटील, ह. भ. प. श्री गणेश नामदेवराव शेडगे (मृदंग अलंकार, संस्थापक/ अध्यक्ष श्री सद्गुरू सेवा संस्था), मनिषा रामचरण लाड (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय मानवाधिकार आणि महिला व बालविकास आयोग), श्री. नितीन पंडित (श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट कोषाध्यक्ष), पतित पावन संघटना शहर अध्यक्ष श्री मनोज पवार , श्री. आशिष पटेल महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष भारती जनता पार्टी अल्प संख्यांक मोर्चा , शिवमुद्रा ढोलताशा पथक अध्यक्ष श्री. आशुतोष देशपांडे व कुणाल भिलारे व पदाधीकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्रीमंत केसरी प्रतिष्ठानच्या सभासदांनी शंखध्वनी, शिंगी, डमरू, झांज, संबळ व डफली या पौराणिक वाद्यांचे अप्रतिम सादरीकरण केले.

राज्यस्तरीय शंखवादन स्पर्धेचे मुख्य परिक्षक म्हणून श्री आनंद खरे आणि ह. भ. प. श्री गणेश शेडगे गुरुजी, आणि सौ. श्रेया फाटक यांनी जबाबदारी पार पाडली. त्यांना ‘परिक्षक सन्मान पत्र’ देऊन सन्मानित करण्यात आले.

विशेष गौरव पुरस्काराने श्री सोमनाथ वाले, संजीव पडवळकर, मोनाली पाटील यांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

प्रसाद बापट, आनंद खरे, शिल्पा जगताप यांना विशेष गौरव पत्र देण्यात आले.

श्रीमंत केसरी प्रतिष्ठानच्या सर्व सेवा धारकांना सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या संपुर्ण उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थापक अध्यक्ष श्री. उमेश घनःश्याम गडे व उपाध्यक्ष सौ. अश्विनी गडे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक श्री घनःश्याम गडे ,कोशाध्यक्ष सुमेध वैद्य, संचालक सुहास गोडसे, संचालक संजय जोशी,आराध्या गडे,  सौ. सुमित्रा गडे, आनंद खरे, सोमनाथ वाले, संजीव पडवळकर, विठ्ठल गोखले, प्रसाद बापट, श्रेया फाटक, गोपी भोजक, शिल्पा जगताप, मोनाली पाटील,आरती तुंगीकर राधिका केळकर, आरती येनपुरे, संस्कार येनपुरे,रोहीनी पंडीत,संगीता निंबाळकर, सुलक्षणा मोरे, रजनी गोरे, शिल्पा जगताप, वीणा जोशी, वैष्णवी वाले , विनय जोशी, गायत्री लोहिया, उमा तातावार, विद्या कुलकर्णी, ध्वजा जैन, निलेश शिंदे, शिवाजी शिंदे, गणेश येनपुरे, आकाश कळसकर, मोहन कदम, योगीता जगताप, कादंबरी जगताप,भारती शहा, मंगल नगरकर, जयश्री शिळवंत, नैतिक झंवर, सार्थक शेडगे, राजवीर, उमा गोखले, पल्लवी भानोथे, स्वाती माटे , आदी सभासदांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अलका जोशी यांनी केले.

राज्यस्तरीय शंखवादन स्पर्धा वयोगटानुसार निकाल

वयोगट -१ वय वर्ष ८ ते १५ वर्ष

प्रथम क्र:- श्रीमंत केसरी महाराष्ट्र शंखरत्न उध्दव विठ्ठल सरजीने नाशिक विभाग
द्वीतीय क्र:-  श्रीमंत केसरी महाराष्ट्र शंखभूषण कौस्तुभ धनंजय मावडीकर पुणे विभाग
तृतीय क्र:-  श्रीमंत केसरी महाराष्ट्र शंखश्री आरध्या उमेश गडे पुणे विभाग
उत्तेजनार्थ :-  प्रेरणा गौरवपत्र निहाल शाम बेदी नाशिक विभाग
उत्तेजनार्थ :- प्रेरणा गौरवपत्र रुद्र विजय पालांडे पुणे विभाग
उत्तेजनार्थ :- प्रेरणा गौरवपत्र वेद अविनाश सेटीये नागपूर विभाग

वयोगट – २ वय वर्ष १५ ते ३० वर्ष

प्रथम क्र :-  श्रीमंत केसरी महाराष्ट्र शंखरत्न आयुष श्याम ढोले पुणे विभाग
द्वीतीय क्र :-  श्रीमंत केसरी महाराष्ट्र शंखभूषण गायत्री राजेश लोहिया पुणे विभाग
तृतीय क्र:-  श्रीमंत केसरी महाराष्ट्र शंखश्री वैभव सुधाकर जाधव नाशिक विभाग
उत्तेजनार्थ :-  प्रेरणा गौरवपत्र वेदांत रामचंद्र माने पुणे विभाग
उत्तेजनार्थ :- प्रेरणा गौरवपत्र भर्गाव गणेश शहाणे पुणे विभाग

वयोगट – ३ वय वर्ष ३० ते ४५ वर्ष

प्रथम क्र:-  श्रीमंत केसरी महाराष्ट्र शंखरत्न जीग्नेश दिलीप परमार कोकण विभाग
द्वीतीय क्र:- श्रीमंत केसरी महाराष्ट्र शंखभूषण संदीप किशोर बारी नाशिक विभाग
तृतीय क्र:- श्रीमंत केसरी महाराष्ट्र शंखश्री राहुल पुरी नागपूर विभाग
उत्तेजनार्थ :- प्रेरणा गौरवपत्र योगिता अतुल जगताप पुणे विभाग
उत्तेजनार्थ :- प्रेरणा गौरवपत्र पुष्कराज राजु गोयल पुणे विभाग
उत्तेजनार्थ :- प्रेरणा गौरवपत्र तन्मय प्रशांत कुलकर्णी नाशिक विभाग

वयोगट – ४ वय वर्ष ४५ ते ६० वर्ष

प्रथम क्र:- श्रीमंत केसरी महाराष्ट्र शंखरत्न अशोक राजाराम वेलहाळ पुणे विभाग
द्वीतीय क्र :- श्रीमंत केसरी महाराष्ट्र शंखभूषण माधुरी पांडुरंग सोनवणे पुणे विभाग
तृतीय क्र:- श्रीमंत केसरी महाराष्ट्र शंखश्री सवीता सतिश देवधर पुणे विभाग
उत्तेजनार्थ :- प्रेरणा गौरवपत्र श्री.मंदार विलास भावे कोकण विभाग
उत्तेजनार्थ :- प्रेरणा गौरवपत्र रवीद्र हरी पाटील कोकण विभाग
उत्तेजनार्थ :-प्रेरणा गौरवपत्र पुर्वा हेमंत धर्माधिकारी नाशिक विभाग

                                             वयोगट – ५ वय वर्ष ६० व त्याहून अधिक

प्रथम क्र:- श्रीमंत केसरी महाराष्ट्र शंखरत्न क्रुष्णा पंढरी डोमके नागपूर विभाग
द्वीतीय क्र:- श्रीमंत केसरी महाराष्ट्र शंखभूषण श्री भरत नारायण परांजपे कोकण विभाग
तृतीय क्र:- श्रीमंत केसरी महाराष्ट्र शंखश्री विनय वसंत वखरे नागपूर विभाग
उत्तेजनार्थ :- प्रेरणा गौरवपत्र सुनील प्रीतमदास उदासी छत्रपती संभाजीनगर
उत्तेजनार्थ :- प्रेरणा गौरवपत्र अभय गोपाळ पुरोहित कोकण विभाग
उत्तेजनार्थ :- प्रेरणा गौरवपत्र सुरेश छगन तांबोळी नाशिक विभाग
राज्यस्तरीय शंखवादन स्पर्धा २०२६ सन्मानचिन्ह – State Level Shankh Vadan Competition Trophy
शंखवादन स्पर्धा २०२६ विजेते सन्मानचिन्ह – Shankh Vadan Competition Winner Trophy
श्रीमंत केसरी प्रतिष्ठान शंखवादन सन्मानचिन्ह – Shrimant Kesari Pratishthan Award
राज्यस्तरीय शंखवादन स्पर्धेचे सन्मानचिन्ह – State Level Shankh Competition Award
राज्यस्तरीय शंखवादन स्पर्धा २०२६ प्रमाणपत्र – State Level Shankh Vadan Competition 2026
शंखवादन स्पर्धा २०२६ उत्कृष्ट कामगिरी प्रमाणपत्र – Shankh Vadan Achievement Certificate
श्रीमंत केसरी प्रतिष्ठान शंखवादन प्रमाणपत्र – Shrimant Kesari Pratishthan Certificate
राज्यस्तरीय शंखवादन स्पर्धा सहभाग प्रमाणपत्र पुणे – State Level Shankh Competition Certificate Pune
शंखवादन स्पर्धा २०२६ सहभाग प्रमाणपत्र – Shankh Vadan Competition Certificate
शंखवादन स्पर्धा प्रमाणपत्र महाराष्ट्र – Maharashtra Shankh Vadan Competition Certificate
शंखवादन स्पर्धा २०२६ सन्मान प्रमाणपत्र – Shankh Vadan Award Certificate