संस्थेचा परिचय
!! श्रीमंत केसरी प्रतिष्ठानचे उद्देश !!
शंख ,शिंगी, डमरु, झांज, तुतारी, डफली,संभळ , चौघळा , नगारा, या सर्व वाद्यानची माहीती व पौराणीक वाद्य वाजवायला शीकवणे ,यात म्हत्वाचे वाद्य शंख – शंखाची ओळख , शंखाची संपुर्ण माहीती , शंखाचा उपयोग, शंख वादनाचे फायदे, हे समाजा पर्यंत पोहचवणे .व ईतर पौराणीक वाद्यानचा प्रचार प्रसार व्हावा व लहान मुलांन साठी संस्कार वर्ग , महिला व पुरुष भजनी मंडळ,गीता पठण, वैदीक वेद पाठशाळा व गोशाळा सुरु करणे.सेवा कार्य : जसे अनाथ आश्रम, वृद्धाश्रम मठ मंदीर सेवाकार्य,कथा , प्रवचन, व्याख्यान, व बौध्दीक वर्गांन सारखे उपक्रम करण्याच्या उद्देशा ने श्रीमंत केसरी प्रतिष्ठान ची स्थापना करण्यात आली आहे.
१. पौराणिक वाद्यांचा प्रचार व प्रसार: शंख, शिंगी, डमरु, झांज, तुतारी, डफली, संभळ, नगारा, चौघळा (चौघडा) इत्यादी पारंपरिक पौराणिक वाद्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्याचे प्रशिक्षण देणे.विशेषतः शंख वादन यावर भर देऊन – शंखाची ओळख,शंखाचा इतिहास व उपयोग,शंख वादनाचे शास्त्रीय, अध्यात्मिक आणि आरोग्यदायी फायदे हे मुद्दे समाजात जागरूक करण्याचा प्रयत्न.
२. संस्कार व सांस्कृतिक कार्यक्रम: लहान मुलांसाठी संस्कार वर्ग,महिला व पुरुषांसाठी भजनी मंडळ,गीता पठण पाठशाळा
३. सेवा कार्य:अनाथाश्रम, वृद्धाश्रम, मठ, मंदिरे येथे सेवा कार्य,कथा, प्रवचन, व्याख्यान व बौद्धिक वर्गांचे आयोजन
४. समाजप्रबोधन:भारतीय संस्कृतीतील विजय घोषाचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक, अध्यात्मिक व आरोग्यदायी शंख वादनाचे महत्त्व समाजात रुजवणे आणि नव्या पिढीला त्याकडे आकर्षित करणे.
५. सांस्कृतिक वारशाचे जतन व प्रोत्साहन: महाराष्ट्रातील पारंपरिक वाद्य परंपरेला सांस्कृतिक मान्यता आणि प्रोत्साहन मिळवून देणे,जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय शंखनाद स्पर्धांचे आयोजन करून या कलेचा जागर करणे.
!! श्रीमंत केसरी प्रतिष्ठान या नावामागील महत्त्व व दिव्यता !!
“श्री” — आपल्या संस्थेच्या नावाची सुरुवातच “श्री” या मंगला क्षराने होते. श्री म्हणजे लक्ष्मी, समृद्धी, शुभत्व आणि आध्यात्मिक तेज. हे नाव श्रीगणेशजींना अर्पण केल्यासारखे आहे — प्रथम पूज्य, विघ्नहर्ता, बुद्धीदाता आणि शांततेचे प्रतीक.
“मंत” — याचा अर्थ संपन्नता, समजूतदारपणा व विचारशीलता. या शब्दाचा संगम आपली संस्था ही केवळ सांस्कृतिक नव्हे तर सामाजिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही समृद्ध आहे हे दर्शवतो.
“केसरी” — हा रंग म्हणजे शौर्य, त्याग, ज्ञान, एकता आणि धर्मनिष्ठा यांचे प्रतीक. आपल्या ऋषीमुनींनी आणि योद्ध्यांनी यालाच धर्मध्वज मानले.
- छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप हे केसरी रंगाचे सर्वोच्च प्रतीक आहे. याच्या माध्यमातून महाराजांचे धैर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याचे स्वप्न साकार करणारा संदेश प्रसारित होतो.
- केसरी म्हणजे धर्माचा प्रकाश आणि अधर्माचा नाश — अंध:कारातून प्रकाशाकडे नेणारी उर्जा.
“प्रतिष्ठान” — या शब्दाचा अर्थ आहे संस्था, सभ्यता, परंपरेचा सन्मान करणारी चळवळ. ही संस्था आपल्या संस्कृतीचे जतन व संवर्धन करणारी आहे — केवळ आजचे नव्हे, तर उद्याचेही भविष्य घडवणारी.
“त्रिशूल” — आपल्या प्रतीकचिन्हातील त्रिशूल हे केवळ शस्त्र नसून धर्म, न्याय व शक्ती यांचे प्रतीक आहे. त्रिशूल आपले रक्षण करते, संकटांचा नाश करते आणि जीवनात सौभाग्य घेऊन येते.
!! संक्षेपात !!
“श्रीमंत केसरी प्रतिष्ठान” हे नाव म्हणजे एक आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रभक्तीपूर्ण ऊर्जा असलेला मंत्र आहे. श्रीगणेशांचे आशीर्वाद, शिवरायांचे प्रेरणादायी नेतृत्व, आणि त्रिशूलाची रक्षणात्मक शक्ती यांचा संगम म्हणजे आपली संस्था!
संस्थापक अध्यक्ष
श्री. उमेश घन: शाम गडे
२०१६ सालापासून पौराणिक वाद्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य अतिशय समर्पणाने करत आहेत. शंखवादन या प्राचीन भारतीय परंपरेला नवसंजीवनी देण्याचा त्यांचा उद्देश आहे. आजपर्यंत हजारो नागरिकांना विनामूल्य प्रशिक्षण त्यांनी दीले असून, त्यांच्या विद्यार्थ्यांचे जाळे संपूर्ण भारतात तसेच विदेशातही पसरलेले आहे.
२०१९ साली ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ तर्फे त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. शंखातून विविध प्रकारचे ध्वनी निर्माण करणे, मंत्रोच्चारासह शंख वाजवणे आणि एकाचवेळी दोन शंख वाजवणे यांसारख्या अद्वितीय कौशल्यांसाठी त्यांना गौरवण्यात आले.
“घर घर शंखनाद – हर घर शंखनाद“ हा त्यांचा प्रमुख ध्यास असून, प्रत्येक घरापर्यंत शंखवादनाची परंपरा पोहोचवणे हेच त्यांच्या कार्याचे मुख्य ध्येय आहे.
२०२४ साली त्यांनी ‘श्रीमंत केसरी प्रतिष्ठान‘ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत पौराणिक वाद्यांचे विनामूल्य प्रशिक्षण, सांस्कृतिक जागृती, आणि परंपरांचे जतन या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले जात आहे.
!! श्रीमंत केसरी प्रतिष्ठान गौरवगाथा !!
RECORD TITLE & DESCRIPTION
Maximum participants performing conch blowing in a competition conducted by an organisation
The record for conducting a competition with the maximum number of participants performing conch blowing was set by Shrimant Kesari Pratishthan of Pune, Maharashtra. The organisation, which was established in 2024 (Registration Number Pune/0000593/2024), conducted a competition in which 300 participants, of different age groups, performed conch blowing on July 27, 2025, at Bhave School, Pune, as confirmed on August 2, 2025.
!! आर्थिक मदतीसाठी आवाहन !!
संस्कृती संवर्धनाच्या कार्यात तुमचाही मोलाचा सहभाग असावा, ही विनंती!
श्रीमंत केसरी प्रतिष्ठान या नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून आम्ही पारंपरिक व पौराणिक वाद्यांच्या प्रचार व प्रसारासाठी सातत्याने कार्य करत आहोत. शंखवादन स्पर्धा, मोफत प्रशिक्षण वर्ग, धार्मीक व सांस्कृतिक कार्यक्रम यातून आम्ही भारतीय संस्कृतीचे संवर्धन करत आहोत.
या कार्यासाठी आर्थिक साहाय्य !
“आपल्या छोट्याशा योगदानातून संस्कृतीचे मोठे कार्य घडेल!”
“पारंपरिक वाद्य वाचवण्यासाठी आपली साथ आवश्यक आहे!”
“चला आपणही या पुनीत कार्यात हातभार लावूया!”
आपण खालीलप्रमाणे मदत करू शकता:
- एकवेळ दान / देणगी
- मासिक / वार्षिक देणगी
- स्पर्धा किंवा प्रशिक्षण उपक्रमासाठी देणगी
- वाद्य खरेदी / प्रशिक्षण साहित्य / प्रिंटिंग खर्चासाठी देणगी
देणगी कशी द्यावी?
बँक डिटेल्स:
Account Name – Shrimant Kesari Pratishthan
Account No. 205001600000213
IFSC- HDFC0CPDCCB
Branch – Vadgaon Dhayari
आपण खालील UPI ID चा वापर करून
सुद्धा देणगी देऊ शकतात.
UPI ID: Getepay.pdccbmqr365739@icici


