श्रीमंत केसरी प्रतिष्ठान आयोजित
कोकण विभागीय शंखवादन स्पर्धा यशस्वीपणे संपन्न!

डोंबिवली, 30 नोव्हेंबर 2025 (रविवार): श्रीमंत केसरी प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने कोकण विभागीय पहिल्या शंख वादन स्पर्धेचे भव्य आयोजन डोंबिवली येथील श्री गणेश मंदिर देवस्थान , श्री गणेश मंदिर पथ, आप्पा दातार चौक , डोंबिवली पूर्व ,पार पडली.ही स्पर्धा कोकण विभागासाठी घेण्यात आली होती. यात मुंबई,ठाणे,पालघर,रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग. जिल्ह्यांमधून विविध वयोगटांतील शंखवादक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी ५ वयोगट बनविण्यात आले होते. प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच ५ उत्तेजनार्थ पारितोषिके व सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

शंखवादन स्पर्धेचे उद्दिष्ट:

या ऐतिहासिक स्पर्धेचा मुख्य उद्देश म्हणजे शंखवादन या पौराणिक परंपरेचा प्रचार व प्रसार करणे, नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे, शंखवादना सारख्या प्राचीन विद्येला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, आणि या परंपरेला आधुनिकतेशी जोडून नव्या जोमाने पुढे नेणे हा उद्देश होता.

!! ही केवळ एक स्पर्धा नव्हे, तर संस्कृती, परंपरा आणि आत्मशक्तीचा एक नवा जागर !!

कोकण विभागीय शंखवादन स्पर्धा २०२५ — यशस्वी आयोजन

या भव्य स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्रीमंत केसरी प्रतिष्ठानचे शिक्षक

श्री. सोमनाथ शशिकांत वाले ,  श्री. संजीव चंद्रशेखर पडवळकर आणि कु. मोनाली पाटील यांची नेमणूक करण्यात आली होती.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री गणेश मंदिर देवस्थानच्या अध्यक्षा सौ. अलका मुतालिक, चितोडे वाणी समाज डोंबिवलीचे उपाध्यक्ष श्री. दिलीप यावलकर तसेच श्रीमंत केसरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. उमेश घन:शाम गडे हे मान्यवर उपस्थित होते.

या मान्यवरांनी आपल्या मनोगतातून श्रीमंत केसरी प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत संस्थेच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचे विशेष अभिनंदन केले. तसेच प्रतिष्ठानच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन आयोजक मंडळाला प्रोत्साहन दिले.

कार्यक्रमात श्रीमंत केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. उमेश घन:शाम गडे यांनी प्रतिष्ठानच्या उद्दिष्टांची व उपक्रमांची माहिती दीली व शंखा बद्द्ल उपयुक्त माहीती देत शंख वादन कसे करावे व विवीध प्रकारच्या शंखध्वीनी व शंख शंखध्वीनी तुन मंत्र उच्चारण व एका वेळेस दोन शंख वाजवत दोन शंख कसे वाजवावे या बद्द्ल मार्ग दर्शन केले व सर्व सहभागी शंखवादकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.या कार्यक्रमास श्रीमंत केसरी प्रतिष्ठान च्या उपाध्यक्ष सौ.अश्विनी उमेश गडे  यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला प्रेरणादायी  मार्गदर्शन केले.

स्पर्धा सकाळी ८:०० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाली आणि दुपारी १२:०० वाजेपर्यंत यशस्वीपणे पार पडली. त्यानंतर दुपारी १:०० वाजता मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व वाद्यपूजन करून बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करण्यात आली.

विजेत्यांचे मान्यवरांनी कौतुक करत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव केले तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. विशेष पुरस्कार हा ८६ वर्षीय श्री मोरेश्वर गणेश काटे यांना सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.

या भव्य समारंभाचा समारोप दुपारी ३:०० वाजता झाला. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, उत्साही आणि भावनाप्रधान वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाचे सर्व सूत्रसंचालन हे स्वत:श्रीमंत केसरी प्रतिष्ठान च्या उपाध्यक्ष सौ.अश्विनी उमेश गडे  यांनी अतिशय उत्तम प्रकारे केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमंत केसरी प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांनी अथक प्रयत्न केले…

!! श्रीमंत केसरी प्रतिष्ठान – परंपरा, संस्कृती, सेवा आणि ऐक्याचे  प्रेरणास्थान !!

कोकण विभागीय शखंवादन स्पर्धा २०२५ विजेते

गट क्रमांक – १ वय वर्ष  ८ ते १५ 

प्रथम क्रमांक – रेहान्श  मंगेश रश्मी कुलकर्णी –  शंख विशारद गौरवपत्र

द्वितीय क्रमांक –रुद्र  तुषार आवकर – उत्कृष्ट शंखवादक सन्मानपत्र

तृतीय क्रमांक –श्रीश शत्रुघ्न कुबल – श्रेष्ठ शंखवादक प्रमाणपत्र

उत्तेजनार्थ –  कु.कपील मयुर पटेल

उत्तेजनार्थ – कु.हिरण्या  प्रकाश दाते

उत्तेजनार्थ – श्रीहान समीर साबळे

उत्तेजनार्थ – कु.साई  नांदे

उत्तेजनार्थ –कु.मिरांग ओंकार महाडिक

गट क्रमांक – ३ वय वर्ष ३० ते ४५

प्रथम क्रमांक – श्री. जीग्नेश दिलीप परमार – शंख विशारद गौरवपत्र

द्वितीय क्रमांक – श्री.सुशांत बेलगावकर – उत्कृष्ट शंखवादक सन्मानपत्र

तृतीय क्रमांक – श्री. सौरभ चित्तरंजन जोशी –श्रेष्ठ शंखवादक प्रमाणपत्र

उत्तेजनार्थ – श्री. प्रसाद अरविंद दाते

उत्तेजनार्थ श्री. राकेश बाबुराव मलेकर

गट क्रमांक – ४ वय वर्ष ४५ ते ६०

प्रथम क्रमांक – श्री. मंदार विलास भावे – शंख विशारद गौरवपत्र

द्वितीय क्रमांक – श्री. गजानन सिद्राम यनगंदूल – उत्कृष्ट शंखवादक सन्मानपत्र

तृतीय क्रमांक – श्री. रविंद्र हरी पाटील – श्रेष्ठ शंखवादक प्रमाणपत्र

उत्तेजनार्थ –श्री. विवेक रामचंद्र पारकर

उत्तेजनार्थ – श्री .आनंद लक्ष्मण जोशी

उत्तेजनार्थ – श्री .रुपेश विश्वनाथ बोराडे

उत्तेजनार्थ – श्री.. सुहास सुलोचना पांडुरंग बडंबें

उत्तेजनार्थ – सौ. पोर्णीमा प्रभाकर हंकारे

गट क्रमांक – ५ वय वर्ष ६० व  त्याहून पुढे

प्रथम क्रमांक – श्री. भरत नारायण परांजपे –शंख विशारद गौरवपत्र

द्वितीय क्रमांक – श्री. मुकुंद सदाशिव गाडगीळ –उत्कृष्ट शंखवादक सन्मानपत्र

तृतीय क्रमांक –  श्री. प्रदीप रघुवीर अडुर – श्रेष्ठ शंखवादक प्रमाणपत्र

उत्तेजनार्थ – सौ. अलका श्रीनिवास कुलकर्णी

उत्तेजनार्थ – श्री. चंद्रकांत वी  माने

उत्तेजनार्थ – श्री. मुकुंद मधुसुधन आपटे

उत्तेजनार्थ – श्री.   अभय गोपाळ पुरोहित

उत्तेजनार्थ – श्री. दीपक  बाळकृष्ण  मोदगेकर

!! या स्पर्धेतील विजेते पुढील वर्षी आयोजित राज्यस्तरीय शंखवादन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्र ठरतील. !!

!! सन्मानचिन्ह व गौरवपत्र !!

!! प्रमाणपत्र !!

!! छायाचित्र !!