श्रीमंत केसरी प्रतिष्ठान आयोजित
नाशिक विभागीय शंखवादन स्पर्धा यशस्वीपणे संपन्न!

दिनांक १२ ऑक्टोबर २०२५  रोजी श्रीमंत केसरी प्रतिष्ठानतर्फे नाशिक विभागीय पहिली शंखवादन स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते . ही स्पर्धा श्री क्षतीय अहिर शिंपी समाज रुखमाई वीठ्ठल मंदिर, मुरलीधर लेन,कापड बाजार,नाशिक येथे पार पडली.ही स्पर्धा नाशिक विभागासाठी घेण्यात आली होती. यात नाशिक,अहमदनगर(अहिल्यानगर),जळगाव,धुळे,नंदुरबार., जिल्ह्यांमधून विविध वयोगटांतील शंखवादक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी ५ वयोगट बनविण्यात आले होते. प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच ५ उत्तेजनार्थ पारितोषिके व सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. 

शंखवादन स्पर्धेचे उद्दिष्ट:

या ऐतिहासिक स्पर्धेचा मुख्य उद्देश म्हणजे शंखवादन या पौराणिक परंपरेचा प्रचार व प्रसार करणे, नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे, शंखवादना सारख्या प्राचीन विद्येला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, आणि या परंपरेला आधुनिकतेशी जोडून नव्या जोमाने पुढे नेणे हा उद्देश होता.

!! ही केवळ एक स्पर्धा नव्हे, तर संस्कृती, परंपरा आणि आत्मशक्तीचा एक नवा जागर !!

 नाशिक विभागीय शंखवादन स्पर्धा २०२५ — यशस्वी आयोजन

या भव्य स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्रीमंत केसरी प्रतिष्ठानचे शिक्षक
श्री. आनंद वसंत खरे, श्री. प्रसाद विनायक बापट , श्री. संजीव चंद्रशेखर पडवळकर आणि कु. मोनाली पाटील यांची नेमणूक करण्यात आली होती.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रुपेश हरिश्चंद्र नाठे (स्वराज्य पक्ष जिल्हा प्रमुख / छत्रपती शिवाजी महाराज यांचे १३ वे वंशज छत्रपती संभाजीराजे), श्री. लक्ष्मण माऊजी चोथाणी (श्री स्वामीनारायण मंदिर) व डॉ. शुभधा जगदाळे (मिसेस इंडिया इंटरनॅशनल दुबई आयुष मंत्रालयाकडून हर दिन हर घर आयुर्वेदासाठी राजदूत ) या मान्यवर उपस्थित होत्या.

या मान्यवरांनी आपल्या मनोगतातून श्रीमंत केसरी प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत संस्थेच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचे विशेष अभिनंदन केले. तसेच प्रतिष्ठानच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन आयोजक मंडळाला प्रोत्साहन दिले.

कार्यक्रमात श्रीमंत केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. उमेश घन:शाम गडे यांनी प्रतिष्ठानच्या उद्दिष्टांची व उपक्रमांची माहिती देत सर्व सहभागी शंखवादकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.या कार्यक्रमास श्रीमंत केसरी प्रतिष्ठान चे संचालक श्री. संजय श्रीकृष्ण जोशी  यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला प्रेरणादायी  मार्गदर्शन केले.

स्पर्धा सकाळी ९:०० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाली आणि दुपारी १:०० वाजेपर्यंत यशस्वीपणे पार पडली. त्यानंतर दुपारी २:०० वाजता मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व वाद्यपूजन करून बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करण्यात आली.

विजेत्यांचे मान्यवरांनी कौतुक करत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव केले तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या भव्य समारंभाचा समारोप दुपारी ५:०० वाजता झाला. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, उत्साही आणि भावनाप्रधान वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाचे सर्व सूत्रसंचालन हे सौ अलका जोशी यांनी अतिशय उत्तम प्रकारे केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमंत केसरी प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांनी अथक प्रयत्न केले…

 

!! श्रीमंत केसरी प्रतिष्ठान – परंपरा, संस्कृती, सेवा आणि ऐक्याचे  प्रेरणास्थान !!

नाशीक विभागीय शखंवादन स्पर्धा २०२५ विजेते

गट क्रमांक – १ वय वर्ष  ८ ते १५ 

प्रथम क्रमांक – कु.निहाल श्याम बेदी –शंख विशारद गौरवपत्र

द्वितीय क्रमांक – कु.उध्दव विठ्ठल सरजीने – उत्कृष्ट शंखवादक सन्मानपत्र

तृतीय क्रमांक – कु.श्र्लोक स्वप्नील पाटील –श्रेष्ठ शंखवादक प्रमाणपत्र

उत्तेजनार्थ –  कु.गौरी जगदीश घोटेकर

उत्तेजनार्थ – कु.वैष्णवी माणिक घोटेकर

उत्तेजनार्थ – कु.रणवीर वैभव जाधव

उत्तेजनार्थ – कु.हर्ष संतोष अष्टेकर

गट क्रमांक – २ वय वर्ष  १५ ते ३०

प्रथम क्रमांक – कु.वैभव सुधाकर जाधव –शंख विशारद गौरवपत्र

द्वितीय क्रमांक – कु.अरविंद दिनकर लोखंडे –उत्कृष्ट शंखवादक सन्मानपत्र

गट क्रमांक – ३ वय वर्ष ३० ते ४५

प्रथम क्रमांक – श्री.तन्मय प्रशांत कुलकर्णी – शंख विशारद गौरवपत्र

द्वितीय क्रमांक – श्री.जनार्धन केदारनाथ पाटील – उत्कृष्ट शंखवादक सन्मानपत्र

तृतीय क्रमांक –  श्री.संदीप किशोर बारी – श्रेष्ठ शंखवादक प्रमाणपत्र

उत्तेजनार्थ – सौ.प्रिया राहुल शुक्ल

उत्तेजनार्थ श्री.निलेश ज्ञानेश्वर देव्हाडराव

उत्तेजनार्थ – श्री.प्रशांत मारुती भरेकर

उत्तेजनार्थ – श्री.अभिजीत रामदास शिंदे

गट क्रमांक – ४ वय वर्ष ४५ ते ६०

प्रथम क्रमांक – सौ.पूर्वा हेमंत धर्माधिकारी – शंख विशारद गौरवपत्र

द्वितीय क्रमांक – सौ.योगीता मनिष गोडबोले – उत्कृष्ट शंखवादक सन्मानपत्र

तृतीय क्रमांक – श्री.मयंक शर्मा – श्रेष्ठ शंखवादक प्रमाणपत्र

उत्तेजनार्थ – श्री.राकेश रमेश आहेर

उत्तेजनार्थ – श्री.अविनाश शामराव आडके

उत्तेजनार्थ – सौ. सुनिता दत्तात्रय खोंडे

उत्तेजनार्थ – सौ. माधवी चव्हाण

उत्तेजनार्थ – सौ. मेधना श्रीकांत दीक्षित

गट क्रमांक – ५ वय वर्ष ६० व  त्याहून पुढे

प्रथम क्रमांक – श्री. बहादूरसिंह भिमसिंह जमादार – शंख विशारद गौरवपत्र

द्वितीय क्रमांक – श्रिमती कुमुद नंदकुमार काथे – उत्कृष्ट शंखवादक सन्मानपत्र

तृतीय क्रमांक – सौ राजश्रि रविंद्र शेलकर – श्रेष्ठ शंखवादक प्रमाणपत्र

उत्तेजनार्थ – श्री. सुरेश छगन तांबोळी

 

!! या स्पर्धेतील विजेते पुढील वर्षी आयोजित राज्यस्तरीय शंखवादन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्र ठरतील. !!

!! सन्मानचिन्ह व गौरवपत्र !!

!! प्रमाणपत्र !!

!! छायाचित्र !!