व्यवसाय / कामाचे स्वरूप

खाद्यपदार्थ 

(लोणचे, पापड, चकली, लाडू इ.),बेकरी / केक / मिठाई / मसाले / पिठे/ अगरबत्ती / धूप / मेणबत्त्या/ साबण / नैसर्गिक उत्पादने / पापड / सांडगे उद्योग.

  हस्तकला व कारागिरी

हातमाग / विणकाम / भरतकाम/ शिलाई / डिझायनिंग / मातीची भांडी / लाकडी भांडी / धातुकाम ( पितळ, तांबे इ. )

वस्त्र व सौंदर्य

टेलरिंग / बुटीक / फॅशन डिझायनिंग /ब्युटी पार्लर / मेहंदी आर्ट / हेअर स्टायलिंग.

सेवा व्यवसाय

दुरुस्ती सेवा (मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स),प्लंबिंग / इलेक्ट्रिकल सेवा/ पेंटिंग / कारपेंटरी / साफसफाई सेवा / वाहन सेवा.

धार्मिक व सांस्कृतिक सेवा

पूजासाहित्य विक्री / धार्मिक साहित्य / धार्मिक पुस्तके / धार्मिक व सांस्कृतिक प्रशिक्षण

डिजिटल व आधुनिक व्यवसाय

ऑनलाइन विक्री / सोशल मीडिया सेवा / ग्राफिक डिझाइन/ कंटेंट क्रिएशन / डिजिटल मार्केटिंग / वेबसाइट / ॲप सेवा .

शिक्षण व प्रशिक्षण

शिकवणी (ट्युशन क्लास),कौशल्य प्रशिक्षण (Skill Training), स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन/ संगीत / नृत्य / अभिनय वर्ग/योग / ध्यान / प्राणायाम प्रशिक्षण/संगणक / डिजिटल कौशल्य प्रशिक्षण / हस्तकला प्रशिक्षण.

उद्देश

श्रीमंत केसरी प्रतिष्ठान यांच्या वतीने स्थापन करण्यात आलेला “श्रीमंत केसरी उद्योग मंच” हा एक समाजोपयोगी व सर्वसमावेशक उपक्रम आहे. या मंचाचा मुख्य उद्देश लघु व गृहउद्योग करणाऱ्या व्यक्तींना एकत्र आणून त्यांना एक विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांना योग्य ओळख मिळवून देणे तसेच स्वावलंबन व रोजगारनिर्मितीला चालना देणे हा आहे.
हा मंच अनुभवाच्या कोणत्याही अटींशिवाय सर्वांसाठी खुला असून नवोदित तसेच अनुभवी उद्योजकांना समान संधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात येत आहे. लघु व गृहउद्योग करणाऱ्या प्रत्येक हाताला बळ, प्रत्येक स्वप्नाला दिशा आणि प्रत्येक प्रयत्नाला ओळख देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
समाजातील छोट्या उद्योजकांसाठी श्रीमंत केसरी उद्योग मंच हा एक विश्वासार्ह आधार, प्रेरणेचा स्रोत आणि यशाकडे नेणारी वाट बनेल, हीच आमची ठाम भावना आहे.

सुचना

उद्योजक व ग्राहक यांच्यातील कोणत्याही व्यवहारात श्रीमंत केसरी प्रतिष्ठानचा कोणताही थेट किंवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप राहणार नाही.

श्रीमंत केसरी उद्योग मंच’ या उपक्रमासंदर्भात निर्णय घेणे, नियमांमध्ये बदल करणे अथवा आवश्यक ते निर्देश देण्याचे सर्व अधिकार श्रीमंत केसरी प्रतिष्ठानकडे राखीव राहतील.